आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी नेहमी काळजी घेण्याची गरज आहे. जर काही संकेत मिळत असतील तर वेळीच लक्ष द्या. हृदयविकाराचा झटका खूप धोकादायक असतो. यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. त्यामुळे हा आजार टाळण्यासाठी त्याचा धोका आधीच ओळखता येऊ शकतो.Heart Attack Warning Sign: हृदयविकाराचा झटका येण्याच्या 4 आठवडे आधी काही संकेत मिळतात. त्यामुळे तुम्ही या 10 गोष्टींकडे दुर्लक्ष करु नका. हृदयविकाराचा झटका जगभरात मृत्यूचे एक प्रमुख कारण बनले आहे. भारतातही अनेक रुग्ण आहेत. आपल्या देशात तेलकट पदार्थ खाण्याचा ट्रेंड खूप वाढला आहे. जे रक्तात खराब कोलेस्टेरॉल जमा होण्याचे कारण बनते. रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज होते तेव्हा रक्त हृदयापर्यंत पोहोचण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. ज्यामुळे रक्तदाब वाढतो. हा रक्तदाब वाढतो आणि नंतर हृदयविकाराचा झटका आणि तिहेरी रक्तवाहिन्यांच्या आजाराचा धोका वाढतो. अशा परिस्थितीत ते कसे टाळावे, हे जाणून घ्या.
हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी काही संकेत
हृदयविकाराचा झटका अचानक येत नाही. परंतु याआधी आपले हृदय अनेक समस्यांमधून जात असते. जेव्हा समस्या हाताबाहेर जाते तेव्हा मोठा धक्का बसतो. हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी, आपले शरीर अनेक सिग्नल देते. ज्याकडे दुर्लक्ष करुन धोक्यापासून सुटका होत नाही. नुकतेच महिलांवर एक संशोधन करण्यात आले, ज्यानुसार हृदयविकाराच्या झटक्याच्या 4 आठवडे आधी आपले शरीर धोक्याचे संकेत देते.संशोधनातून काय पुढे आले...
जर्नल सर्कुलेशनमध्ये प्रकाशित झालेल्या रिपोर्टनुसार, हृदयविकाराचा झटका येण्याच्या सुमारे 1 महिन्यापूर्वी त्याचे धोक्याचे संकेत दिसायला लागतात. हा अभ्यास 500 हून अधिक महिलांवर करण्यात आला आणि त्यांना हृदयविकाराच्या झटक्यापासून वाचवण्यात आले. सुमारे 95 टक्के महिलांनी सांगितले की, त्यांच्या शरीरात एक महिन्यापूर्वीच काही लक्षणे दिसू लागली आहेत. 71 टक्के लोकांना थकवा जाणवला. तर 48 टक्के लोकांना झोपेशी संबंधित समस्या होत्या. याशिवाय छातीत दाब, छातीत दुखणे अशा समस्या होत्या.
हृदयविकाराचा इशारा:
तुमच्या शरीरात खालीलपैकी कोणतीही समस्या असल्यास, ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा आणि आवश्यक चाचण्या करा, कारण ते हृदयविकाराच्या झटक्याचे लक्षण असू शकते.
Disclaimer: The information provided here should not be used during any medical emergency or for the diagnosis or treatment of any medical condition. The information is provided solely for educational purpose and should not be considered a substitute for medical advice.